सिल्लोड- शहरातील
रजाळवाडी येथील सामान्य शेतकरी व शेतमजूरांमध्ये सहभागी होवून त्यांना मिठाई व फटाके वाटून आमदार
अब्दुल सत्तार यांनी दिवाळी साजरी केली.
सिल्लोड शहरातील
रजाळवाडी येथे मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर राहतात. दीपावली
च्या दिवशी सायंकाळी पाच वाजेपर्यंत या भागात दिवाळी आहे की नाही असे चित्र होते.
मात्र आमदार अब्दुल सत्तार हे सायंकाळी अचानक वाडीवर आले, सोबत त्यांनी बाल
गोपालांना फटाके तसेच प्रत्येक परिवाराला दिवाळी फराळ व मिठाई घेऊन आल्याने येथील नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला.
सण उत्सव हे संस्कृतीने
आपल्याला दिलेला एक अनमोल ठेवा
आहे. दुष्काळी स्थिती जरूर आहे पण यात खचून न जाता सर्वांनी एकत्र येवून दुष्काळावर
मात करण्यासाठी प्रयत्न करू असा संकल्प या दिवाळी निमित्त करू. तसेच येत्या काळात
पाणी अडवा पाणी जिरवा, वृक्ष लावा आणि जगवा हे ब्रीद घेवून विविध उपक्रम राबवून
पाण्याचा वापर काटकसरीने करा असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव पा तायडे, पं स सदस्य निजाम पठाण, नगरसेवक सुनील दुधे, डॉ दुधे, सलीम हुसेन आदींची उपस्थिती होती.














